कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ; २४ तासांत देशात ४६ हजारांहून जास्त नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४६ हजारांहून जास्त कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत एक हजार रुग्ण अधिक आढळून आले आहेत. नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील एकूण रुग्णसंख्याही वाढत गेली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार २३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढ झाल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ५० हजार ५९८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर देशात २४ तासांत ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील एकूण करोना मृतांची संख्या १ लाख ३२ हजार ७२६ इतकी झाली आहे. सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाचा रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात ८४ लाख ७८ हजार १२४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४९ हजार ७१५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १० लाख ६६ हजार २२ चाचण्या करण्यात आल्या.

दरम्यान, करोनासंदर्भात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. करोनाच्या सुरूवातीच्या काळात रुग्णांवर वापरण्यात रेमेडिसिविर हे औषध जागतिक आरोग्य संघटनेने औषधांच्या यादीतून वगळले आहे. करोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध सर्रास देण्यात येत होते. मात्र आता हे औषधांच्या यादीतून WHO ने बाद ठरवलं आहे. हे औषध करोना बरे होण्यासाठी गुणकारी ठरतं यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही असेही WHO ने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.