जम्मू काश्मीर : राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढणार

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर भाष्य केले आहे.

दरम्यान, अमित शहांनी 356 चा वापर करून 20 सप्टेंबरपासून जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव यावेळी सभागृहात सादर केला आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना 3 टक्के आरक्षण द्यावं असं देखील यावेळी अमित शहा म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.