राष्ट्रपती राजवट म्हणजे, मतदारांचा केलेला घोर अपमान-राज ठाकरे

मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर आज राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे.

दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे”. असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.