टोकियो – युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी आता रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्यासाठी जपानच्या संसदेला संबोधित करण्याचा निर्णय घेतला आहे. ते बुधवारी जपानच्या संसदेला संबोधित करणार आहेत.
जपान आणि रशियाचे पूर्वी फार सख्य होते. मात्र आता प्रभावशाली “जी-7’देशांच्या देशांप्रमाणेच जपाननेही रशियाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व आशियामध्ये चीनकडूनही आपल्या लष्करी कारवाया वाढवायला सुरुवात केल्या असल्यामुळे आता जपानची मदत युक्रेनसाठी महत्वाची ठरू शकते.
झेलेन्सकी हे जपानच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 10 मिनिटांचे भाषण करणार आहेत. यापूर्वी झेलेन्सकी यांनी अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहालाही आभासी माध्यमातून संबोधित केले होते. त्याचप्रमाणे युरोपीय संघ, कॅनडा आणि इस्रायलच्या संसदेमध्येही त्यांनी संबोधन केले आहे.