नवी दिल्ली: कोरोना विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस गेब्रेयेसस यांच्यादरम्यान जागतिक स्तरावर सहकार्य करण्यावर चर्चा झाली. या चर्चेत कोरोनावरील आधुनिक पद्धतीच्या उपाय योजनेसोबतच पारंपरिक पद्धतीच्या औषधांचाही वापर करण्यावर एकमत झाले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
Had an excellent conversation with DG of @WHO @DrTedros. We discussed the vast potential of traditional medicine for promoting health and wellness in the world. I also assured India's support to WHO and the world community in the fight against COVID-19. https://t.co/IjvFRMOzUv
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2020
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांची फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत जागतिक स्तरावर कोरोनाविरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि त्यासाठी लागणारे भारताचे सहकार्य यावर चर्चा झाली.” असे सांगण्यात आले आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी कोरोना विरोधात लढताना अन्य रोगांच्या विरोधातील लढाईकडे दुर्लक्ष होऊ नये असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून विकसनशील देशांना मिळणाऱ्या मदतीवर समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, “जागतिक आरोग्य संघटननेच्या अध्यक्षांनी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. तसेच ‘आयुष्मान भारत’ योजनाची अंमलबजावणी आणि क्षयरोगाविरोधातील भारताचा लढा याचीही स्तुती केली.” त्यांनी सांगितले की, “भारताला याबाबतीत अजून महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेदरम्यान डब्लूएचओच्या अध्यक्षांना सांगितले की, “कोविड-19 साठी आयुर्वेद’ या थीमवर आधारित 13 नोव्हेंबरला भारतात आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यांनतर टेड्रोस गेब्रेयेसस यांनी पंतप्रधानांच्या या कार्याचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.”
जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की,”भारतीय पंतप्रधानांसोबत पारंपरिक औषधांचा अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण यांच्याबाबतीत सहकार्य करण्याविषयी चर्चा झाली. जागतिक स्तरावर आरोग्य आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज संदर्भातील भारताच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.” पुढे ते म्हणाले की,” COVAX च्या प्रति भारतीय पंतप्रधानांची ठाम भूमिका आणि त्यांनी कोविड-19 च्या लसीची जागतिक स्तरावर उपलब्धता करण्यासाठी जोर दिल्याबद्दल धन्यवाद.”