सध्याचे सरकार हे दहशतवादी – प्रकाश राज

राजू शेट्टींच्या प्रचारार्थ इचलकरंजीत जाहीर सभा
कोल्हापूर – “सिंघम’ फेम अभिनेता प्रकाश राज हे थेट शेतकऱ्यांचा नेता असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या प्रचारात उतरले आहेत. आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची मुले सीमेवर लढत असतात आणि शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक पिकवत असतात. त्यामुळे देशामध्ये दोन्ही आघाड्यांवर शेतकरी संरक्षण करत असतात. तसेच सध्याचे सरकार हे दहशतवादी असल्याची टीका करत चौकीदार खाली खेचण्यासाठी तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आज इचलकरंजी शहरामध्ये अभिनेता प्रकाश राज यांनी विविध भागांमध्ये फिरून खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार केला. यावेळी आयोजित एका प्रचार सभेत प्रकाश राज बोलत होते.

अभिनेते प्रकाश राज यांनी सरकारवर टीका करत दुसरीकडे राजू शेट्टी हे माझे चांगले मित्र आहेत. राजू शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांना आजवर त्यांनी न्याय दिला आहे. शेतकऱ्यांसाठी दिल्लीमध्ये त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. त्यामुळे मी या सरकारच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात आलो असल्याचे राज यांनी म्हटले आहे
प्रकाश राज म्हणाले, आताचे सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशामध्ये स्थिर सरकार आले पाहिजे. सध्याचे सरकार आणि देशाचा चौकीदार हा चोर आणि दहशतवादी आहे. या सरकारला खाली खेचलेच पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली. तसेच देशामध्ये सध्या हा:हाकार माजला आहे. या सरकारच्या विरोधात मीही निवडणुकीसाठी उभारलो आहे, असेह स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.