नरेंद्र मोदींविषयी भेंडवड घटमांडणीने केलं हे भाकित म्हणाले,’देशाचा राजा कायम राहील मात्र…’

करोनाबाबत भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताने चिंता वाढवली

बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेले  होते. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असे  भाकित करण्यात आले आहे.

यावेळी त्यांनी  पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल. असं ही सांगितले तर देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल.  अशाप्रकारे भेंडवड घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले.

दरम्यान, यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे. तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव मिळणार नाही. यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे.  कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.