गुंतवणुकीतील स्त्री शक्तीचा जागर (भाग-१)

प्रत्येक घरात मुलगी जन्माला आली किंवा घरातील मुलाचे लग्न झाल्यावर नववधू घरी येते त्यावेळी कुटुंबात नेहमीच म्हटले जाते की, लक्ष्मी घरात आली. याचाच अर्थ भारतीय संस्कृतीत प्रत्येक स्त्रीला लक्ष्मीचे रुप मानले आहे. गेली अनेक दशके प्रत्येक भारतीयांच्या घरातील सर्व बाबींची जबाबदारी घरातील स्त्रिया उचलत आल्या आहेत. कमावत्या पुरुषामागे घरातील स्त्री खंबीरपणे उभी राहून असलेल्या उत्पन्नात अत्यंत यशस्वीरित्या आपले घर चालवत असते. घरात होणारा खर्च व घरात येणारे उत्पन्न यांचा ताळमेळ व्यवस्थित बसवणारी व उपलब्ध पैशात काही बचत करणारी घरातील स्त्री ही खऱ्या अर्थाने लक्ष्मीच असते.

प्रत्येक स्त्रीने जमा केलेला पैसा हा कसा आणि कुठे गुंतवावा याबाबत आज आपण पाहणार आहोत. आर्थिक स्वातंत्र्य ही सर्वात मोठी बाब प्रत्येक व्यक्तीसाठी यासाठी कुटुंबातील प्रत्येक आर्थिक निर्णयात सहभागी होत कुटुंबाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याच्या कामी स्त्रीचा मोठा वाटा असतो. आज स्त्रिया देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या संख्येने भाग घेताना दिसत आहेत. देशात नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्त्रीकडे सोपवण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार विचारपूर्वक केली आहे. देशाच्या तिजोरीच्या चाव्या खऱ्या अर्थाने स्त्रीच्या हाती दिल्या आहेत. नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात – स्त्रिया अतिशय वेगाने तंत्रज्ञानाचा वापर आत्मसात करत आहेत. याचा फायदा देशाला मोठ्या प्रमाणात होत आहे. समाजात स्त्रीची भूमिका फार महत्त्वाची आहे.

प्रत्येक स्त्री घरामध्ये व समाजात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. आई, पत्नी, मुलगी, सून अशा अनेक रुपात धैर्य, प्रेम व त्याग याचा त्रिवेणी संगम आपल्याला स्त्रीच्या व्यक्तिमत्वात पाहायाला मिळतो. घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच घराबाहेरही अत्यंत यशस्वीरित्या स्त्रिया स्वतःची भूमिका विविध रुपात पार पाडत असतात. उदाहरणार्थ – शिक्षिका, राजकारणी, वक्ता, वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी अशा अनेक रुपात स्त्रिया यशस्वी होताना दिसत आहेत.

गुंतवणुकीतील स्त्री शक्तीचा जागर (भाग-२)

कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा भावनिक संकटातून प्रत्येक स्त्री मोठ्या शिकस्तीने मात करते. अशावेळी आर्थिक नियोजनाच्या महत्त्वाच्या बाबीतही स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आर्थिक विश्वात उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांचा योग्य वापर करणे व कुटुंबासाठी तसेच मुलांच्या भविष्यासाठी स्त्रियांनी पारंपारिक गुंतवणूक पर्यायांसोबतच नवीन असणाऱ्या फायदेशीर व खऱ्या अर्थाने काळानुरूप गुंतवणूक पर्यायांमध्ये आपली बचत केलेली रक्कम गुंतवली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.