देशात शीतपेय बाजारात येणाऱ्य़ा काळात वृद्धी होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – देशात शीतपेय बाजारात येणाऱ्य़ा काळात वृद्धी होण्याची शक्‍यता आहे. 2021 पर्यंत शीतपेय वर्षाला प्रति व्यक्‍ती 84 बाटलीपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे.

पेप्सिको इंडियाचे बॉटलिंग भागीदार वरुण बेव्हरेजेस च्या अहवालानुसार 2016 मध्ये एक व्यक्ती वर्षाला सुमारे 44 बाटल्या शीतपेय पीत होती. यात 2021 पर्यंत वाढ होऊन 84 बाटल्यांवर पोहोचेल, अशी शक्‍यता या अहवालात सांगण्यात आली आहे.

शीतपेय उद्योगातील सर्व श्रेणीत खासकरून ज्यूस आणि बाटलीबंद पाणी यामध्ये व्यापक वाढ होईल, असे अहवालात म्हटले आहे. ज्यूस आणि बाटलीतील पाण्यासाठी मध्यम वर्गातील लोकांची वाढलेली मागणी, आणि शहरीकरणाच्या वाढीसह ग्रामीण विद्युतीकरणाचे घटक शीतपेय उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

कोला कार्बोनेट्‌सशिवाय लिंबू ज्युससारखी पेय वाढण्याची शक्‍यता आहे. भारतात पेप्सिकोच्या विक्रीत कार्बोनेट्‌स पेयांची 51 टक्‍के हिस्सेदारी आहे. लोकांमध्ये पाण्यापासून होण्याऱ्य़ा आजारांबाबत जागरूकता आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.