लोकसभेतील उपसभापतीपद शिवसेनेला मिळण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – लोकसभेतील उपसभापतीपद “एनडीए’तील मित्रपक्ष शिवसेनेला मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सरकारशी निकटच्या सूत्रांनी रविवारी ही शक्‍यता वर्तवली आहे. 17 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 26 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनकाळात उपसभापदींची नियुक्‍ती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या अधिवेशनात हे पद कोणाला दिले जाते याकडे सरकारमधील घटकपक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभेतील उपसभापतीपद शिवसेनेला मिळावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी सर्वप्रथम व्यक्‍त केली होती. मात्र हे पद मिळवण्यासाठी वायएसआर कॉंग्रेस आणि बिजू जनता दलही शर्यतीत असल्याचे बोलले जात होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वायएसआर कॉंग्रेस आणि बिजू जनता दलाने या शर्यतीतून माघार घेतली आहे.

उपसभापतीपद मिळवण्यासाठी शिवसेनेकडून “एनडीए’वर दबाव आणला जाऊ लागला आहे. या संदर्भात शिवसेनेशी दोनवेळा चर्चाही करून झाली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेचे 18 खासदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)