पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता

पुणे – गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिल्यानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमनाची चाहुल दिली आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे मेघगर्जनेसह आणि पावसाची शक्‍यता आहे. पुण्यासह राज्यात गुरुवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर उन्हाचा चटका वाढला आहे.

उत्तर अरबी समुद्र आणि गुजरात किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता काहीशी वाढण्याचे संकेत आहेत. यामुळे गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आहे. सोमवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुण्यासह नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सकाळपर्यंत अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.