कोल्हापूरमध्ये माळीणच्या पुनरावृत्तीची शक्यता; डोंगराला भल्यामोठ्या भेगा

कोल्हापूर – मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागाला खूप मोठा फटका बसला आहे. असेच एक उदाहरण समोर आला आहे. सततच्या झालेल्या अतिवृष्टी मुळे कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात दुसरं माळीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं चार गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. आजरा तालूक्यातील वझरेपैकी खोतवाडी पेरणोली पैकी नावलकरवाडी आणि धनगरवाडा ही चार गाव भितीच्या छायेखाली आहेत. शिवारबा डोंगराला पाच किलोमीटरपर्यंत मोठ्या भेगा पडल्या असून प्रशासनाचे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी तेथे गेले नसल्याचं समोर आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.