देशभर टाईल्सच्या दरात वाढ होण्याची शक्‍यता

जयपूर – एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून सिरॅमिक टाईल्सच्या दरात 10 ते 20 टक्‍के वाढ करणार असल्याची घोषणा मोरबी असोसिएशनकडून करण्यात आली.

गुजरातमध्ये जवळपास 800 सेनिटरी वेअर उत्पादन करणारे 800हून अधिक व्यापाऱ्य़ांची संघटना आहे. वाढत जाणाऱ्या इंधन व कच्च्या मालांसह अन्य उत्पादनात होत असणारी घट यामुळे दरवाढ करावी लागत आहे. याच ठिकाणाहून भारतातील अन्य विभागात 70 टक्‍के उत्पादनांचा पुरवठा केला जात असल्याचे यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले.

याअगोदर गुजरात प्रदूषण महामंडळाने प्रदूषणात वाढ होत असल्याच्या कारणांमुळे 400 कारखाने बंद केले आहेत. त्यामुळे मंदीचा फटका टाईल्स व्यापाराला बसल्याचे या विभागाचे अध्यक्ष निलेश जेतपरिया यांनी म्हटले आहे. म्हणून सिरॅमिक्‍स व्यापाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत आम्ही किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.