इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढण्याची शक्‍यता

नवी दिल्ली: सध्या देशातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे दिवसेंदिवस डेटा स्वस्त व अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे देशातील इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत 2023 पर्यंत 40 टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. त्याच बरोबरीत स्मार्टफोन बाळगणाऱ्यांची संख्याही दुपट होण्याचे संकेत मॅकिन्जी यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सन 2013 पासून मिळणाऱ्या इंटरनेट डेटाच्या किमती 95 टक्‍क्‍यांनी घटत गेल्या आहेत. तर मुख्य डिजिटल क्षेत्र 2025 पर्यंत दोन पट वाढ होत जात 355 ते 435 अब्ज डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जागतिक स्तरावरचा विचार करता भारतातील डिजिटल वापर करणाऱ्यांच्या संख्येत सर्वात वेगाने वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 2018 पर्यंत इंटरनेटचा वापर करणाऱ्याचा आकडा 56 कोटी आहे. जो चीनशी तुलना केल्यास काही प्रमाणात कमी असल्याचे पाहावयास मिळत आहे. भारतात प्रति महिना 5.30 जीबी डेटाचा वापर इंटरनेट वापरकर्ते करताहेत. तर चीनमध्ये हा आकडा 8.50 जीबी आणि दक्षिण कोरियासारख्या तंत्रज्ञानाची प्रगती झालेल्या देशात 8 ते साडेआठ जीबीचा डेटा वापरला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.