आगामी काळात डिजिटल व्यवहार वाढण्याची शक्‍यता

पुणे – आगामी काळात डिजिटल व्यवहार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पारदर्शक व्यवहार होण्यास चालना मिळणार असल्याचे बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष मनीष जैन यानी सांगितले.

बजाज फायनान्स व आरबीएल बॅंकेने बजाज फिनसर्व आरबीएल सुपरकार्ड सुरू केले असून डिजिटल व्यवहार साक्षरतेमुळे दोन वर्षांच्या कालावधीत ग्राहक टप्पा एक दशलक्षपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. हा मैलाचा टप्पा गाठणारे हे भारतातील पहिले को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्ड ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेब्रुवारी 2017 मध्ये बजाज फिनसर्व आरबीएल बॅंक सुपरकार्ड बाजारात दाखल करण्यात आले होते. सुपर कार्डच्या 1 दशलक्ष कार्डधारकांपैकी 40% हून अधिक ग्राहक पहिल्यांदाच क्रेडीट कार्डचा वापर करणारे आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंट उपक्रमात वित्तीय सहभाग वाढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)