विदर्भासह पुण्यात जोरदार सरींची शक्यता

पुणे –  ऋतुचक्रानुसार सध्याचे वातावरण म्हणजे ऑक्‍टोबर हीटचा जोर थोडा कमी होऊन थंडीची चाहूल देणारा असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. ही स्थिती कायम राहणार असून मुंबईत हलक्या सरी तर विदर्भातील काही भागांसह पुण्यामध्ये एक-दोन जोरदार सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. दरम्यान, पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात येत्या २४ ते ४८ तासांत गडगडाटासह जोरदार सरींची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

दरम्यान, पावसाचा जोर जर कायम राहिला तर दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.