राज्यात येत्या 13 ऑक्‍टोबरपर्यंत विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता -गिरीश महाजन

नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला जोर आला आहे. त्यातच आता या निवडणुका येत्या 10ते 13 ऑक्‍टोबरपर्यंत पार पडण्याची शक्‍यता राज्याचे वैद्यकिय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्‍त केली आहे. नाशिकमध्ये जिल्हा नियोजन बैठकीत त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे. तसेच 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्‍यतादेखील त्यांनी वर्तवली.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखेचा विचार करून आपण यंदाच्या निवडणुकांचा अंदाज व्यक्‍त केला असल्याचे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर भाष्य करत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये आले आहेत. तर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात केवळ समोरच्या रांगेतीलच नेते शिल्लक राहिले असल्याचा टोला यावेळी लगावला. तसेच या दोन्ही पक्षातील उरलेल्या नेत्यांचेही भाजपकडे लक्ष लागून राहिले असून त्यांच्यासमोर आता दुसरा कोणताही पर्याय राहिला नसल्याचेही महाजन यांनी म्हटले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)