लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र

सिनेसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात अनेक नायक-नायिकांचा ऑनस्क्रिन रोमान्स पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिला. पण त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या जोड्या सुपरहिट झाल्या. यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल ते शाहरुख खान आणि काजोल या जोडगोळीचे.

 

View this post on Instagram

 

Happy happy birthday to my sweet friend. To many more smiles like this ! Have a wonderful day @iamsrk

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

“दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि “कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटांमधून झळकलेल्या या जोडीला प्रेक्षकांनी शब्दशः डोक्‍यावर घेतले. आता शाहरुख आणि काजोल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. राजकुमार हिराणी दिग्दर्शित एका चित्रपटामधून हा सुवर्णयोग प्रेक्षकांना साधणार आहे.

 

View this post on Instagram

 

Traditional all the way… #joyalukkas #fullyready #chennai

A post shared by Kajol Devgan (@kajol) on


“झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखचा एकही चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. वास्तविक, अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्याच्याकडे चित्रपटासाठीचा प्रस्ताव घेऊन गेले; परंतु चित्रपटनिवडीबाबत कोणतीही चूक करायची नाही असा ठाम निर्धार केल्यामुळे शाहरुखने कोणाचाही प्रस्ताव स्वीकारला नाही.


पण राजकुमार हिरानींचा प्रस्ताव मात्र त्याने स्वीकारल्याचे समजते. शाहरुखने होकार दिल्यानंतर हिरानी काजोलची मनधरणी करत आहेत. मध्यंतरी, करीना कपूरलाही त्यांनी विचारणा केल्याचे समजते. पण निर्मात्यांची पहिली पसंती काजोललाच आहे.

 

View this post on Instagram

 

@iamsrk @kajol | Karan Arjun / 1995 ❤️ #WeWantSrkajolBack

A post shared by ????? ????? ?. (@perfectkajol) on


हा चित्रपट एक लव्ह स्टोरी असल्याचे सांगितले जात आहे. कथानकावर अद्याप काम सुरु आहे. शाहरुख आणि काजोल यापूर्वी रोहित शेट्टीच्या “दिलवाले’ चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचे पुढे काय होते ते पाहायचे !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.