मुंबई – सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी “प्रिया बापट- उमेश कामात’ यांना करोनची लागण झाली आहे. स्वतः उमेश कामात याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिती या संदर्भातील माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बातमीच आहे.
उमेश आपल्या पोस्ट म्हणतो कि, “दुर्दैवाने माझी आणि प्रियाची कोरोन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी देखील बाळगत आहोत. सगळ्या नियमांचेही पालन करत आहोत. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील, त्यांनी देखील कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे. असं तो म्हणाला.
सध्या उमेश कामात आणि प्रिया बापट घरातच सेल्फ क्वारंटाईन झाले असून, त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उमेश आणि प्रिया त्यांच्या आगामी वेब सीरीजच्या चित्रीकरणात व्यस्त होते आणि याच वेळी त्यांना करोनची लागण झाल्याचं समजतंय.