Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय अग्रलेख

अग्रलेख : राष्ट्रपती निवडणुकीचे राजकारण

by प्रभात वृत्तसेवा
June 23, 2022 | 6:00 am
A A
अग्रलेख : राष्ट्रपती निवडणुकीचे राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व अशा घडामोडी घडत असतानाच तिकडे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी भाजप आघाडीने आपला उमेदवार म्हणून आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला, तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. म्हणजेच आता पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षातर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांच्यामध्ये ही महत्त्वाची निवडणूक होणार आहे. 

भारतीय लोकशाही व्यवस्थेप्रमाणे खरेतर राष्ट्रपती आणि राज्यपाल ही पदे पक्षविरहित असली, तरी त्यांची नियुक्‍ती आणि निवडणूक होत असताना राजकारण होणे अपरिहार्य असते. सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी आघाडीने आपापला उमेदवार जाहीर केला आहे, ते पाहता त्यामागे निश्‍चितच राजकारण आहे. राष्ट्रपतिपदासाठी आपला उमेदवार जाहीर करत असताना भाजपने नेहमीच आश्‍चर्याचा धक्‍का देण्याचे काम केले आहे. गेल्या वेळीसुद्धा रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करून त्यांनी एका दलित नेत्याला सर्वोच्च पदावर निवडून जाण्याची संधी दिली होती. खरे तर तेव्हाच द्रौपदी मुर्मू यांचे नाव समोर आले होते; पण रामनाथ कोविंद यांना संधी देण्यात आली. आता द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करून एक प्रकारे विरोधी पक्षांनासुद्धा बुचकळ्यात टाकले आहे. एका महिलेला त्यातसुद्धा एका आदिवासी समाजातील महिलेला उमेदवारी देऊन विरोधकांच्या निवडणूक प्रक्रियेला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, विरोधी आघाडीने कोणताही उमेदवार दिला असता, तरी भाजपाचा उमेदवार विजयी होण्यास फारशा अडचणी नव्हत्या. पण या निवडणुकीत नियमाप्रमाणे विजयी उमेदवाराला 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळण्याची गरज असते. भाजपाची आकडेवारी पाहता त्यांना दोन ते अडीच टक्‍के मते कमी पडत होती.

ओडिशातील आदिवासी समाजातील महिलेला ही उमेदवारी देऊन भाजपने त्या अडीच टक्‍के मतांचीसुद्धा बेगमी केली आहे. कारण, ओडिशामधील राष्ट्रपती निवडणुकीतील मतांचा कोटा साधारण दोन ते तीन टक्‍क्‍यांच्या आसपासच आहे. मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाल्यावर ज्या प्रकारे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आनंद व्यक्‍त केला आहे ते पाहता ओडिशाची मते संपूर्णपणे भाजपच्या उमेदवाराला मिळणार यात कोणतीही शंका नाही. याव्यतिरिक्‍त देशातील इतर आदिवासीबहुल राज्य आमदार आणि खासदारही आपोआपच या उमेदवाराकडे आकृष्ट होतील यातही शंका नाही. एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च पदावर बसवण्याचे काम करणे एवढा एकच उद्देश भाजपाचा असला, तरी त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचे राजकारणही लक्षात घ्यावे लागणार आहे. भाजपने एका आदिवासी महिलेला

सर्वोच्च स्थान दिले याची जाणीव ठेवून आदिवासी मतदारही भाजपकडे आकृष्ट होण्याची संधी निर्माण झाली आहे. दुसरीकडे भाजपाला विरोध करण्याच्या भावनेतून विरोधी आघाडीने यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. खरे तर यशवंत सिन्हा हे पूर्वी भाजपाच्या आघाडीतील सरकारमध्ये मंत्री होते; पण मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे बिनसल्याने त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली होती. गेल्या काही कालावधीमध्ये सतत भाजपवर टीका करण्याचे काम यशवंत सिन्हा यांनी केले आहे. त्यातूनच यशवंत सिन्हा यांचा चेहरा पुढे आणण्याचे काम विरोधी आघाडीने केले आहे. सरकारला विरोध करणारा एक नेता याच निकषातून यशवंत सिन्हा यांची निवड करण्यात आली असली, तरी ज्या प्रकारे भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे ते पाहता यशवंत सिन्हा यांच्या अडचणी निश्‍चितच वाढल्या आहेत. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधी आघाडीचा उमेदवार कोण असेल, याचा विचार करण्यापूर्वीच भाजपने द्रौपदी यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले होते.

ही परिस्थिती पाहता पुढील महिन्यात जेव्हा राष्ट्रपतिपदाची निवडणूक होईल तेव्हा देशाला दुसरी महिला राष्ट्रपती मिळण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यातही आदिवासी समाजातील महिला असणे जास्त समाधानकारक आणि स्वागतार्ह गोष्ट ठरणार आहे. अर्थात, द्रौपदी मुर्मू या समाजातील कोणत्या घटकातून येतात हे महत्त्वाचे असले, तरी त्यांची क्षमताही तेवढीच आहे हेसुद्धा विसरून चालणार नाही. झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या मुर्मू यांनी ओडिशामधील सरकारमध्ये मंत्री म्हणूनसुद्धा चांगले काम केले होते. त्यांच्या कामाचा अनेक वेळा गौरवही झाला होता. ओडिशामध्ये जेव्हा भाजप आणि बिजू जनता दल यांचे संयुक्‍त सरकार होते त्या काळामध्ये मुर्मू यांनी एक मंत्री म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली होती. साहजिकच एक सक्षम असा चेहरा सर्वोच्च पदासाठी देण्याचे काम भाजपाने केले आहे, असे म्हणावे लागेल.

केवळ विरोधासाठी विरोध करून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी कायम ठेवण्याचे काम विरोधी आघाडी करते का हे पाहावे लागेल. यशवंत सिन्हा यांची मंत्री म्हणून आणि राजकारणी म्हणून कारकीर्दसुद्धा खूप चांगली आणि समाजाभिमुख होती. त्यामुळे केवळ सरकारला विरोध करण्याच्या भावनेतून ते ही निवडणूक लढवतात की, माघार घेऊन मुर्मू यांना संधी देतात हेही पाहावे लागेल. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राजकारण हा अविभाज्य भाग असला तरी राष्ट्रपतिपदासारख्या सर्वोच्च पदाची निवडणूक बिनविरोध झाली, तर त्यातून एक चांगला संदेश जाऊ शकतो.

Tags: editorial page articlepoliticspresidential election

शिफारस केलेल्या बातम्या

Latest Update : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचेही बंड; ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याकडे आणखी एक पाऊल
Top News

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

2 hours ago
अग्रलेख : ओरिजनल ठाकरे!
Top News

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार बुधवार; या ‘तीन’ घडामोडींवर सर्वांचंच लक्ष

6 hours ago
आता पवारांचं स्वप्न पूर्ण झालं असेल ; शिवसेनेच्या स्थितीवरून मनसेचा टोला
latest-news

आता पवारांचं स्वप्न पूर्ण झालं असेल ; शिवसेनेच्या स्थितीवरून मनसेचा टोला

8 hours ago
ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल
latest-news

ज्याच्या भरवशावर मोठं व्हायचं त्याचंच घर पोखरून टाकायचं…’ : नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

9 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: editorial page articlepoliticspresidential election

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!