निवडणुकीची राजकीय रंगत निर्णायक टप्प्यावर

उमेदवार व कार्यकर्त्यांची वाढली धावपळ

सातारा – सातारा तसेच माढा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. आता शेवटच्या पाच-सहा दिवसात प्रचाराचा जोर वाढणार असून त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची रिघ लागली आहे.

मेळावे आणि बैठकांसाठी जादा परवाने घेण्यात आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस 2 तर भाजपने एक हेलिकॉप्टर परवाना मिळवला आहे. सातारा आणि माढा या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. गावागावांतील पारांवर लोकसभा निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. श्रमिक, कष्टकरी, शेतकरी वर्गातही निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली आहे.

कोणता उमेदवार निवडून येणार? कोणाला कितीचे लीड से मिळणार? कुठे दगाफटका होणार? सद्या या गोष्टींनाही उधाण येवू लागले आहे. नेत्याची निवडणूक प्रतिष्ठेची करणाच्या कार्यकत्यांची धावपळ वाढली आहे. निवडणुकीचे काम करुन कार्यकत्यांना प्रचारासाठी आवश्‍यक असणारे परवाने काढण्यासाठीही पळापळ करावी लागत आहे. लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी सहज परवाना उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमातीमध्ये एक खिडकी कक्ष स्थापन केला आहे.

या कक्षाच्या माध्यमातून विविध परवाने कागपत्रांची खातरजमा करुन दिले हात आहे. या परवान्यांमध्ये महाआघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांनी काढलेल्या परवान्यांची संख्या जास्त आहे. सार्वजनिक सभेसाठी 2, प्रचार कार्यालयांसाठी 2, पदयात्रा व रॅलीसाठी 2, सभा व मेळावे यासाठी 12, वाहन परवान्यामध्ये हेलिकॉप्टरसाठी 3 तर स्पीकर जाहिरातीसह 31 वाहन परवाने काढण्यात आले आहेत. त्यानंतर काही परवाने मंजुरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. चार दिवसांपूर्वी निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परवाने काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली.

वाहन परवाने देताना प्रत्यक्ष वाहने आणावी लागत असल्याने त्यांची परिसरात गर्दी होऊ लागली आहे. एक खिडकी कक्षांमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी असल्याने उमेदवारांच्या प्रतिनिधींना तातडीने परवाने उपलब्ध होत आहेत. त्यांचे श्रम वाचले आहे. काही उमेदवारांनी शहर आणि ग्रामीण भागात एकाचवेळी प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे. काही जणांना अजून सूर सापडला नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही उमेदवारांचे कार्यकर्ते चांगले चार्ज झाले असून त्यांच्याकडून प्रचार मोहीम राबवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.