kutimb

लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलीस अधिकारी करोनाबाधित

पिंपरी – करोना योद्धा म्हणून पोलिसांना लस देण्यात आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील एका अधिकाऱ्याला लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सर्वांत आधी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना करोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या पोलिसांनाही लस देण्यास सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरात 15 फेब्रुवारीपासून पोलिसांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश आणि अतिरिक्‍त आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी प्रथम लस घेतली. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनीही लस घेतली. 15 फेब्रुवारी रोजी करोना लस घेतल्यानंतर 16
फेब्रुवारी रोजी एका अधिकाऱ्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सध्या पोलीस दलामध्ये 11 जण करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी पाच जण रुग्णालयात उपचार घेत असून सहा जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 564 पोलीस करोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 550 जण करोनामुक्‍त झाले आहेत. तर आतापर्यंत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.