परमविर सिंहांविरोधात पोलीस निरीक्षकाचा जबाब नोंदवला

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या खुल्या चौकशीचा भाग म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला आहे, अशी माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली.

परमबिरसिंह यांच्या विरोधात घाडगे यांनी केल्या तक्रारीच्या आधारे गुन्हेगारी कारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि ऍट्रॉसिटीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खुली चौकशी करण्याची परवानगी “एसीबी’ने अलिकडेच राज्य सरकारकडून मिळवली आहे. घाडगे यांनी परमबिर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि वरीष्ठ निरीक्षकांच्या नियुक्‍त्यांसाठी पैसे स्वीकारण्याची तक्रार घाडगे यांनी केली होती.

घाडगदे यांचा जबाब “आसीबी’ने शुक्रवारीच नोंदवून घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्याबद्दलचा कोणताही तपशील देण्यात आला नाही. या प्रकरणी आणखीन काही लोकांचे जबाब नोंदवून घेण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केल्या तक्रारीच्या आधारे “एसीबी’ परमबिर सिंहांविरोधात एक अन्य चौकशीही करत आहे. निलंबित असताना सेवेत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी सिंह यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती, अशी तक्रार डांगे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.