पोलिसानेच केली शरीरसुखाची मागणी

गुन्ह्यात अडकलेल्या भावाची मदत करण्याचा बहाणा

पुणे – कोठडीत असलेल्या व्यक्तीची मदत करण्याचे सांगत त्याच्या बहिणीशी ओळख वाढवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या हवालदाराविरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दादाराम ताकमोडे हा पोलीस हवालदार शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

तरुणीच्या भावावर स्वारगेट पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो बंडगार्डन पोलिसांच्या कोठडीत होता. दरम्यान, संबंधीत पोलीस हवालदाराने मदत करण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीची ओळख करून घेतली.

तिचा मोबाइल नंबर घेऊन वेळीवेळी तिच्याशी बोलत राहिला. त्यानंतर 24 डिसेंबर 2020 रोजी लग्नासाठी स्थळ दाखवण्याचे निमित्त करून पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर आरोपी तिला घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.