पीएमपीच्या “ब्रेकफेलला” ब्रेकच लागेना

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गाड्यांचे ब्रेकफेल चे सत्र थांबता थांबत नसल्याची परिस्थिती आहे. मागील आठवड्यात सलग दोन वेळा ब्रेकफेल मुळे गाडयांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या असताना आज पुन्हा एक बस ब्रेकफेल झाल्याने तोफखानाजवळ काम सुरू असलेल्या बीआरटीच्या कठड्याला बस धडकण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या प्रकारात कुठलाही प्रवाशी जखमी झाला नाही. परंतु या सततच्या घटनांमुळे बस देखभाल कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुक्रवारी बेंगलुरू महामार्गावर आंबेगाव बु.जवळ ब्रेकफेल झाल्याने कात्रज आगाराची बस एका कारला जाऊन धडकली. दुसऱ्या दिवशीही याच बसचे ब्रेकफेल झाले. ही बस स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गात भारती हॉस्पीपटसमोर बॅरिकेट्सला धडकली. असेच घटनासत्र गुरुवारीदेखील सुरूच होते. न.ता.वाडी आगाराची बस सकाळी अकरा वाजता मनपा भवन येथून मुंढव्याच्या दिशेने निघाली होती. काही अंतर कापल्यानंतर लगेच या बसचे ब्रेकफेल झाल्याने चालकाकडून  प्रसंगावधान दाखवत मेट्रो कामाच्या सुरक्षा कठड्याला बस धडकावली. त्यानंतर सर्व प्रवाशी सुरक्षितपणे बाहेर पडले. दरम्यान प्रत्येकवेळी चालकाची चूक दाखवून अधिकारी त्यांच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकवेळी चालकाचीच चूक असेल असे नाही त्यामुळे चालकाबरोबर अधिकाऱ्यांनाही दोषी धरण्यातयावे अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे. 

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.