पथविक्रेत्यांना सर्वेक्षणानंतर मिळणार हक्‍काची जागा

आतापर्यंत 1 हजार 543 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण 

नगर – महापालिकेकडून शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शहरात आतापर्यंत 1 हजार 543 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम सेवादर नागरी सहकारी संस्थेस दिली आहे. यासंदर्भात आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली पथविक्रेता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पथविक्रेता सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. अद्यापपर्यंत 1 हजार 543 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून उर्वरित पथविक्रेत्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्‍त भालसिंग यांनी दिली.

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पथविक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असून विक्रेत्यांचे बचतगट तयार करणे, व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देणे, मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे आदी शासकीय योजनांचा त्यांना मनपामार्फत लाभ मिळवुन देण्यात येणार आहे. या बैठकीस पथविक्रेता प्रतिनिधी उपस्थित होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.