औषधांसाठीची पायपीट थांबणार! यापुढे एटीएममधून बाहेर येणार औषधे; जाणून घ्या सरकारची नवीन प्रणाली

नवी दिल्ली : देशभरातील गावखेड्यातील लोकांची औषधांसाठीची पायपीट यापुढे थांबणार आहे. अकारण आता  सरकारकडून चोवीस तास औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्यसाठी त्यांना फक्त  ब्लॉकमध्ये असलेल्या औषधांच्या एटीएमपर्यंत जावे लागेल. देशातील सर्व सहा हजार ब्लॉकमध्ये, अशा प्रकारचे एटीएम मशीन लावण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. आयटी मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरने  शुक्रवारी आंध्र प्रदेश सरकारच्या AMTZ नावाच्या कंपनीसोबत यासाठी करार केला.

सीएससीचे आधीपासूनच ब्लाक स्तरावर अयूर संजीवनी केंद्र सुरू आहेत. याच केंद्रांवर औषध वितरण करणारे एटीएमदेखील बसविले जातील. गर्भधारणा, करोना तपासणी सोबतच, इतरही अनेक वैद्यकीय उपकरणे या केंद्रांवर ठेवली जातील. त्यांच्या ऑपरेशनसाठी CSC च्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात  एका वृत्तसंस्थेने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

CSC कडून गावांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर अथवा कॉन्सन्ट्रेटरही पुरविले जातील. नाममात्र शुल्क देऊन त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत सर्व ब्लॉकमध्ये औषधींचे एटीएम बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

एटीएम मशीनमध्ये टाकली जाणार डॉक्टरांची चिठ्ठी, त्यानुसारच औषध येणार –
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सीएससी एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी यांनी सांगितले, की सीएससीच्या संजीवनी केंद्रात व्हर्च्युअल पद्धतीनेच लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात. औषधांचे प्रिस्क्रिप्शनही व्हर्च्युअल पद्धतीनेच जनरेट होते.

मात्र, यानंतर औषधी आणण्यासाठी गावकऱ्यांना एकतर शहरात जावे लागते अथवा कुणाला तरी पाठवून ती माघवावी लागतात. पण आता सर्व ब्लॉक्समध्ये औषधी देणाऱ्या एटीएमची सुविधा होणार असल्याने त्यांना लगेचच औषधी मिळत जाईल. या एटीएम मशीनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी टाकली जाईल आणि त्यानुसार मशीनमधून औषधी बाहेर येईल.

या मशिन्ससाठी ई-कॉमर्स कंपन्या औषधींचा पुरवठा करतील. यात बहुतांश जेनेरिक औषधेच ठेवली जातील. याशिवाय, केंद्रावर विविध प्रकारच्या चाचण्यांसाठी उपकरणांची सुविधाही असेल. याच बरोबर, पुढील महिन्यापासून एएमटीजेड ग्रामीण उद्योजकांना मेडिकल उपकरणांच्या ऑपरेशनसाठी विशाखापट्टनम येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यागी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.