पायलट आणि क्रू मेंबरच्या भांडणामुळे विमान 2 तास लेट

बंगळुरू: माझा डबा का धुत नाहीस म्हणुन क्र मेंबर सोबत भांडणाऱ्या पायलटमूळे एयर इंडियाचे बंगळुरू ते कोलकाता जाणारे विमान तब्बल दोन तास लेट झाले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून एयर इंडियाने या प्रकाराची नोंद घेत दोघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पायलटने आधी या कर्मचाऱ्याला डब्यातील जेवण गरम करण्यास सांगितले. जेवण झाल्यानंतर त्याने हा डबा धुवून आण असे त्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्या कर्मचाऱ्याने डबा धुण्यास नकार देताच पायलट चिडला काही वेळातच दोघांमधील वाद हमरीतुमरीवर आला. विमानातील प्रवाशांसमोरच त्यांनी एकामेकाला हाणामारी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून प्रवासी थक्‍क झाले होते. एयर इंडियाच्या व्यवस्थापनालाही याची माहिची मिळताच त्यांनी लगेच दोघांना विमानातून उतरवले. मात्र, दुसऱ्या नवीन पायलटची व्यवस्था व्हायला बराच वेळ लागला. यामुळे विमानाच्या टेक ऑफला दोन तास उशीर झाला. प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.