बॅालीवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची झलक चाहत्यांसोबत नेहमीच इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून श्रद्धा आपल्या फॅन्ससोबत सतत कनेक्ट राहते. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा केली जात आहे. श्रद्धाने शेअर केलेला फोटो हा दुसरा तिसरा कोणाचा नसून तिचा प्रियकर राहुल मोदीसोबतचा आहे.
मात्र, शेअर केलेला दोघांचाही फोटो पूर्ण नसून त्यामध्ये केवळ दोघांचे पाय दिसत आहेत. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देखील दिलेलं नाही. केवळ हा फोटो राहुल याला टॅग केला आहे. यामुळे हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा प्रियकर राहुल मोदी या दोघांचे पाय दिसत आहेत. दोघांनीही एकसारखा पोशाखा घातला आहे.
श्रद्धाने या फोटोला कोणतही कॅप्शन न देता केवळ हा फोटो राहुल मोदी याला टॅग केला आहे. टॅगवेळी तिने रेड हार्ट ईमोजी वापरला आहे. खरंतर श्रद्धा आणि राहुल हे दोघे एका डिनर डेटनंतर मुंबईत एकत्र दिसले होते. यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असलल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. दोघांनी यावर मीडियासमोर भाष्य केलेले नाही. मात्र, श्रद्धा नेहमीच तिचे राहुल सोबतचे फोटो शेअर करत असते.
२०२४ मध्ये आलेल्या स्त्री २ या सिनेमात श्रद्धा कपूर दिसली होती. या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत बंपर कमाई केली. जवळपास ८०० कोटी रुपयांची सर्वाधिक कमाई स्त्री २ सिनेमाने केली. यानंतर श्रद्धाच्या आगामी सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली आहे. नागिन या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.