फिलीपाईन्स पाठोपाठ व्हिएतनामकडूनही चीनी हालचालींना आक्षेप

हनोई – फिलीपाईन्सने गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्रातील चीनी हालचालींना आक्षेप घेतल्यानंतर आता व्हिएतनामनेही चीनच्या मासेमारी नौकांच्या हालचालींवर आक्षेप घेतला आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सागरी भागात चीनी मासेमारी नौका असल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. चीनने हनोई प्रांताच्या स्वायत्ततेचा मान राखावा. असेही व्हिएतनामने म्हटले आहे.

चिनी मासेमारी नौका व्हिटसन खाडीमध्ये आणि एका बेटाजवळ आढळल्याचे व्हियेतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्‌याने म्हटले आहे. हा भाग सिंग टोन डॉंग या व्हिएतनामच्या बेटाजवळ असून संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायदाविषयक ठरावा अंतर्गत व्हिएतनामचा स्वायत्त भाग असल्याचे या प्रवक्त्‌याने म्हटले आहे.

फिलीपाईन्सच्या संरक्षण प्रमुखांनीही रविवारी चिनी सागरी हालचालींवर आक्षेप घेतला होता. चिनी नौसेनेच्या नौका व्हिट्‌सन खाडीमध्ये आढळल्या असून हा भाग फिलीपाईन्सच्या आर्थिक क्षेत्राचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिका आणि फिलिपाईन्स मध्ये चिनी गाडीमध्ये वावरत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.