रामपूर – आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबध असल्याच्या संशयाने पछाडलेल्या एका विकृत व्यक्तीने अंगावर शहारे उभे राहतील असे कृत्य केले आहे. त्याने पत्नीचे हातपाय बांधत व ती ओरडू नये म्हणून तोंडात बोळा कोंबून तारेने तिचे गुप्तांग शिवले.
ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला असून त्या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील ही घटना आहे. त्या दोघांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच पती विक्षिप्त वागत होता व तिला मारहाण करत होता. मात्र तरीही ती सगळा त्रास सहन करत संसार करत होती. मात्र त्याने आता कळसच केला. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले होते.
त्यातून त्याने तिला घरात कोंडले आणि हा धक्कादायक प्रकार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो पसार झाल्यावर तिने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली व फोनवर हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यावर तीची सुटका करत तिला इस्पितळात दाखल करण्यात आले.