मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. रंगोली नेहमीच सोशल माध्यमांमध्ये आपल्या बेधक आणि टीकात्मक प्रतिकिया शेअर करत असते. यातच रंगोली चंडेलनं आता निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट यांच्यावर निशाणा साधला आहे.
Bhatt saab kitabein padh lene se hum sirf badi batein seekh sakte hain, bade ban nahin sakte, jawan ladki ko jaangh pe bithakar aise kiss karke photo khichwate ho, insaan apne karmon se bada banta hai, kya kiya hai aapne desh keliye? Yeh sab farzi libralpan ab nahin chalega..?? pic.twitter.com/DVfiMbdQgK
— Rangoli Chandel (@Rangoli_A) December 16, 2019
महेश भट यांनी CAA बद्दल नुकतंच एक ट्वीट करत आपलं मत व्यक्त केलं होत या ट्विटवर रिट्विट करत रंगोलीने महेश भट्ट यांच्यावर टीका केली आहे. रंगोलीने ट्विट केले आहे की, ‘भट साहब, पुस्तक वाचून आपण फक्त मोठ्या गोष्टी बोलू शकतो. मोठं होऊ शकत नाही. तरुण मुलीला मांडीवर बसवून तिच्यासोबत फोटो काढता. व्यक्ती त्याच्या कर्मांनं मोठी होते. तुम्ही देशासाठी काय केलं आहे. तुमचं हे ढोंगी स्वतंत्र्य आता चालणार नाही.’ असं लिहत रंगोलीनं महेश भट आणि पूजा भट यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात हे दोघंही लिपलॉक किस करताना दिसत आहेत. या फोटोवरुन अनेक लोकांनी महेश भट यांच्यावर टीका केली होती.