मुंबई – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने आता भारतात आपले पाय रोवले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला करोनाची धडकी भरली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे यांसारख्या अनेक गोष्टी लोक करताना दिसत आहे. तसेच गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
Because our safety always, always comes first. Stay safe and take care of yourself ??
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहित शेट्टी ने आपला आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ पुढे ढकलला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या बद्दल माहिती देण्यात आली आहे. येत्या 24 मार्चला सूर्यवंशी जगभर रिलीज होणार होतो.
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच ‘अजय देवन’, अभिनेता ‘रणवीर सिंग’, जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री कतरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.