रेंटल यिल्डची टक्केवारी वाढली (भाग-२)

रेंटल यिल्डची टक्केवारी वाढली (भाग-१)

एनसीआरमध्ये काही ठिकाणी फायदे
रेंटल यिल्डचा विचार करता एनसीआर मधील काही भागात घरमालकांना चांगले भाडे मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यात नोईडा एक्‍स्प्रेस-वे, सिटी सेंटरजवळील मालमत्ता यांचा समावेश आहे. या ठिकाणी घरमालक दरवर्षी मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 3.4 टक्के उत्पन्न भाड्याच्या माध्यमातून घेत आहेत. अलीकडच्या काळात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नोईडा एक्‍स्टेन्शनमध्ये रेंटल यिल्ड 2.8 टक्के आहे. इंदिरापूरममध्ये भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांवर मंदीचा प्रभाव जाणवत आहे. या ठिकाणी रेंटल यिल्ड 2.7 टक्के इतका आहे. गुडगावच्या सोहना रोड आणि गोल्फ कोर्स रोडवर रेंटल यिल्ड सरासरी 3.4 टक्के आहे. अन्य भागाच्या तुलनेत इथे भाडेवाढीचे प्रमाण अधिक दिसून येते.

फरिदाबाद येथे रेंटल यिल्डचा विकास नकारात्मक राहिला आहे. मात्र ग्रेटर फरिदाबादमध्ये हा 3.1 ते 3.8 टक्के इतका राहिला आहे. तर दिल्लीत सरासरी रेंटल यिल्ड 3 टक्के आहे. द्वारका एक्‍स्प्रेस वे परिसरात वार्षिक यिल्ड 2.5 टक्के राहिला आहे. दिल्लीत बहुतांश मोठ्या निवासी योजना किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्‍समध्ये रेंटल जुन्याच दरावर कायम आहेत. एका अभ्यासानुसार अलिकडेच मॅनेज्ड रेंटल आणि को-लिव्हिंगचा वाढता ट्रेंड पाहता भाड्यात तेजीचा रोख दिसून येत आहे. पुढेही तो कायम राहील.

घरांच्या विक्रीत वाढ होतेय
एका अहवालाचा विचार केल्यास मोठ्या शहरातील घरांच्या विक्रीत सुधारणा झाली आहे. रोकड टंचाई, खरेदीदारांची नकारात्मकता असे वातावरण असतानाही कोलकता, हैदराबाद सारख्या शहरात घराच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत निवासी श्रेणीतील घरांच्या विक्रीत जबरदस्त 40 टक्के वाढ दिसून आली आहे.

आर्थिक सुधारणांचा परिणाम
अहवालाशी निगडित तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षातील झालेल्या आर्थिक सुधारणा पाहता रिअल इस्टेट क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी, इन्साल्वेसी अँड बॅकरप्सी कोड तसेच बेहिशेबी मालमत्ता अॅक्‍ट यामुळे रिअल इस्टेटच्या कारभारावर बराच परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, रेरा आणि जीएसटीच्या प्रारंभी विकसकांना अनेक अडचणी आल्या होत्या. आता मात्र बऱ्याच अडचणी दूर झाल्याने रिअल इस्टेट उद्योग पूर्वपदावर येत आहे. जानेवारी ते सप्टेबर या कालावधीतील सकारात्मक आकडे पाहिल्यास खरेदीदार घराची खरेदी करण्यास दिरंगाई करत नसल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.