fbpx

देशातील जनतेला मिळणार कोरोनाची मोफत लस ;सरकार सकारात्मक

भुवनेश्वर : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा
पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे.

देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी दिली आहे. ओदिशाचे अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर. पी. स्वॅन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय पशुपालन, डेअरी, मत्स्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री सारंगी यांनी सांगितले की, सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.

स्वॅन यांनी फ्री वॅक्सिनची मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सारंगी यांच्याकडे उत्तर मागितलं होतं. हे दोन्ही केंद्रीय मंत्री सध्या ओदिशामध्ये आहेत. बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घोषणा केली होती की, बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस दिली जाणार आहे. यावरुन स्वॅन यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना घेरले. त्यानंतर सारंगी यांच्याकडून सारवासारव करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.