नवी दिल्ली – पाऊस येत नाही म्हणून मध्य प्रदेशच्या दमोह गावात बेडकाला दोरीला उलटं टांगले असून गावातील मुलींना विर्वस्त्र करून गावभर फिरवण्यात आल्याची घटना घडली आहे. या गावातील गावकऱयांनी अंधश्रद्धेला बळी पडत गावातील मुलींवर अत्याचार केला आहे.
National Commission for Protection of Child Rights sends a writes to collector of Damoh, Madhya Pradesh over media reports saying that minor girls were paraded naked for bring rain in a tribal-dominated block; seeks action taken report & the girls’ age certificate within 10 days
— ANI (@ANI) September 6, 2021
मिळलेल्या माहितीनुसार, दमोह गावात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गावकऱ्यांनी गावात पाऊस जास्त प्रमाणात यावा यासाठी परंपरेनुसार चालत आलेल्या काही प्रथा सुरू केल्या आहेत. गावातील जुन्या प्रथेनुसार गावकऱयांनी एकत्र येत लहान मुलींचे कपडे काढले आणि त्यांना गावभर फिरवले. त्यासोबत बेडकांना सुद्धा दोरीला उलटे टांगत गावभर फिरविण्यात आले. अंधश्रद्धेतून त्यांनी असं केलं.
सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रथेची सर्व स्थरातून टीका केली जात आहे. प्राणी प्रेमींकडून या प्रथेचा विरोध केला जात आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडावा म्हणून विविध गोष्टी देखील केल्या जातात. चित्र-विचित्र प्रकार केले जातात.