व्यवस्थापकीय संचालक महिलेविरुध्द दत्तवाडीत गुन्हा दाखल
पुणे: इलेक्ट्रॉनिका मेकॅट्रॉनिक सिस्टम युनिट कंपनीत 1 कोटी 63 लाख 96 हजाराचा अपहार करण्यात आला. या अपहार प्रकरणी व्यवस्थोपकीय महिला संचालकाविरुध्द दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी 47 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार त्यांच्या कंपनीत आरोपी महिला व्यवस्थापकीय संचालक पदावर नोकरी करत होती. तीने फिर्यादीच्या वडिलांच्या वयाचा आणी स्मृतिभ्रंशाच गैरफायदा घेऊन शेअर होल्डर असणाऱ्या इस्पेक्स कंपनीचा फायदा करुन दिला.
यासाठी इस्पेक्स कंपनीच्या परदेश दौऱ्याच्या व प्रर्दशणाच्या खर्चापोटी एकूण 1 कोटी 55 लाख 59 हजार रक्कम दाखवून तसेच सदर कंपनीच्या विम्याचा खर्च फिर्यादीच्या कंपनीच्या खर्चात टाकला. याबरोबरच कंपनीने दिलेल्या डेबीट कार्डव्दारे वैयक्तीक वापराच्या वस्तू खरेदी करुन व परदेश दौरा, हॉटेल खर्च आणी कंपनीकडून बिनव्याजी रकमा, स्वत:चा वैयक्तीक पगार कित्येक पटीने वाढवून कंपनीचे एकूण 1 कोटी 63 लाख 96 हजार रुपयांचा अपहार केला आहे. हा अपहार 2008 ते 2016 दरम्यान केला गेला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सलगर करत आहेत.