रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

पुणे विभागात करोनामुक्‍तांचे प्रमाण तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढले

पुणे – पुणे विभागात मागील आठ दिवसांत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

आतापर्यंत सापडलेल्या 4 लाख 48 हजार 920 बाधितांपैकी 3 लाख 70 हजार 593 जण बरे झाले आहेत. हे प्रमाण जवळपास 82.55 टक्‍के आहे. तर मागील आठवड्यात हे प्रमाण जवळपास 79 टक्‍के इतके.

विभागात सद्य:स्थितीत 66 हजार 399 बाधितांवर उपचार सुरू आहे. त्यातील निम्मे म्हणले 37 हजार 68 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.

तर अन्य सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील आहे. विभागात आतापर्यंत 11 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.66 टक्‍के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.