कुरवली – उदमाईवाडी (ता. इंदापूर) येथील 30 वर्षीय युवकाला करोनाची लागण झाली आहे. त्याचा चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुणे येथे कामासाठी असणारा हा युवक गावात आल्यानंतर (दि.5) स्वॅब तपासणी केली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कुटुंबातील दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गावात रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी न घेतल्यास भविष्यात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सणसर आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, वालचंदनगर पोलीस उपाययोजना राबवित आहेत.