नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 9,120 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,13,830 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.13 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या संक्रमित रुग्णांची संख्या 1,68,269 असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
शासकीय प्रयोगशाळांची संख्या 715 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे. यात एकूण 974 प्रयोगशाळांचा समावेश आहे. 350 शासकीय आणि 193 खाजगी अशा एकूण 543 प्रयोगशाळांमध्ये जलद आरटी पीसीआर आधारित चाचणीची सुविधा करण्यात आली आहे. तर 338 शासकीय आणि 18 खाजगी अशा एकूण 356 प्रयोगशाळांमध्ये ट्रू नॅट आधारित चाचणीची सुविधा करण्यात आली आहे.
सीबीएनएएटी आधारित चाचणीसाठी 75 प्रयोगशाळांमध्ये सुविधा आहेत. गेल्या 24 तासात 1,89,869 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 66,16,496 नमुने तपासण्यात आले.