मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. जवळपास 12 वर्षे अविरत ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेनं आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य आणलं आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Thank you for your love. Your love inspire us pic.twitter.com/PC7oiQivLT
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) May 3, 2020
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचा फॅन असलेली व्यक्ती ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात होता. त्यांनी मुलाला आयसीयूमधून वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यावर तारक मेहता का उल्टा चश्मा लावण्यास सांगितले. टीव्ही लावल्यानंतर वडिल मालिका पाहत असतानाचा फोटो मुलाने टिपला.
मुलाने पोस्टमध्ये म्हटले की, “जेठालाल आणि दया बेन स्क्रीनवर दिसताच वडील हसू लागले. ते ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये असून त्यांनी पहिल्यांदा एक मागणी केली की वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आधी तारक मेहता का उल्टा चश्मा लाव. ते शिफ्ट झाले तेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा लावताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले”.
दरम्यान, त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे या फॅनच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत.