पार्सल जिथून आले तिथेच परत पाठविते – सुप्रिया सुळे

पुणे – राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या बारामतीत आज एका महिलेच्या विरोधात सारे विरोधक एकवटले आहेत; पण चिंता करू नका 23 तारखेला यांचे पार्सल जिथून आले तिथे परत पाठवते, अशा शब्दात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस घटक पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेचा समाचार घेतला.

माझ्यावर टीका करायला विरोधकांना मुद्दाच सापडत नसल्यामुळे त्यांची पातळी दिवसेंदिवस घसरत असल्याचा दावाही त्यांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघातील नीरा आणि खेड शिवापूर येथे शुक्रवारी सुळे यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार शरद पवार यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, मी तिसऱ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभी आहे. प्रत्येकवेळी माझ्या समोर नवीन उमेदवार असतो. एकदा तो हरला की पुन्हा 4 वर्ष 11 महिने दिसत नाही. यांना जर खरोखर बारामती जिंकायची आहे, तर 5 वर्षे ग्राऊंडवर काम करत नाहीत? असा खडा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. केंद्रीय मंत्री, राज्यातले मंत्री, खासदार, आमदार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या, संपूर्ण यंत्रणा सुप्रिया सुळे या एकट्या महिलेच्या समोर उभ्या केल्या असल्याचे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.