पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत गुरूवारी निघणार

नगर  – जिल्ह्यातील चौदा पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण सोडत गुरुवार.दि.12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे. दरम्यान,जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी निवड दि.21 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.

राज्यातील इतर अनेक जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यातच विधानसभा निवडणुकांमुळे जुन्या सभापतींना चार ते पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने व आता परत ही प्रक्रिया उशिरा होत असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता.

दरम्यान,अकोले तालुक्‍यातील राजूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.किरण लहामटे हे विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्यामुळे या रिक्‍त झालेल्या जागेची निवडणूक या आठवड्यात जाहीर होणार आहे. या जिल्हा परिषद गटातील मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.