श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील सांबा जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवनांनी गोळ्या घालून यमसदनी धाडले.
शुक्रवारी पहाटे प्रचंड पाऊस पडत होता. धुकेही खूप असल्याने स्पष्ट दिसत नव्हते. त्याचा फायदा घेत या घुसखोराने भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला रोखण्यासाठी हवेत गोळीबार करून परत जाण्याचा इशारा दिला. मात्र त्यानंतरही त्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने त्याला ठार करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खूप धुके आणि पाउस असल्याने त्याचा मृतदेह तातडीने ताब्यात घेतला नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.