Asia Cup | पाकलाच नकोय आशिया करंडक

कराची – पाकिस्तान क्रिकेट मंडळालाच यंदा आशिया करंडक स्पर्धेत खेळण्याची इच्छा नाही. पीसीबीने आपल्या पाकिस्तान क्रिकेट लीगच्या फ्रॅंचाईजी मालकांना हा संदेश कळवला आहे. या वर्षीची एकूण परिस्थिती लक्षात घेता आशिया करंडक स्पर्धा घेऊ नये, अशी भूमिका पीसीबीने घेतली असल्याचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सांगितले.

आशिया करंडक स्पर्धा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सप्टेंबर 2020 मध्ये श्रीलंकेत होणार होती. मात्र, करोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा या वर्षी जून महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट लीगमधील फ्रॅंचाईजी मालक आणि मणी यांच्यात ऑनलाइन बैठक झाली.

या बैठकीतच मणी यांनी आशिया करंडक स्पर्धेस विरोध दर्शविला आहे. या बैठकीनंतर लगेच पाकिस्तान लीगमधील शिल्लक लढती या जूनपासून पुढे खेळविण्यात येतील असेही जाहिर करण्यात आले. आशिया करंडक स्पर्धेच्या तारखांचा पाकिस्तान लीगमध्ये अडथळा येत असल्याची भिती फ्रॅंचाईजी मालकांनी व्यक्त केल्यानंतर मणी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिया करंडक स्पर्धेत सर्व संघांनी सहभागी व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत हे शक्‍य वाटत नसल्यामुळे स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता आहे, असा विश्‍वास मणी यांनी या बैठकीत फ्रॅंचाईजी मालकांना दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.