मनोहर पर्रीकर यांना भारतरत्न देण्यासाठीच्या हालचालींना वेग

पणजी – देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय घेतलेला नाही. पण अनौपचरिक चर्चा सुरू असल्याचे समजले आहे.

मनोहर पर्रिकर हे फक्त गोव्याचेच नव्हे तर भारताचे संरक्षण मंत्री म्हणूनही मोठे नेते होते. त्यामुळे या पुरस्कारासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे असून याबाबतचा पुढील निर्णय प्रमोद सावंत घेतील असे वृत्त आहे. मनोहर पर्रिकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.