गणेशमूर्ती निर्मितीच्या कामाला आला वेग

नगरमध्ये लाखभर मूर्तींची निर्मिती; दर जैसे थे, परगावच्या रवानगी सुरू


इकोफ्रेंडली गणपतीचा परिणाम नाही

शाडूच्या मातीपासून केलेल्या गणपतीच्या मूर्ती जास्तीत जास्तनाजूक असल्याने त्या हातळण्यास अवघड असतात त्यामुळे पीओपीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे त्यातच पीओपीची मुर्ती पर्यावरणास धोकादायक नाही हे जवळपास सर्वांनीच मान्य केल्यामुळे इकोफ्रेंडली गणपतीचा तसा कोणताही परिणाम बाजारपेठेत दिसून आला नाही.शिवाय पीओपीच्या मुर्तीपेक्षा शाडुच्या मातीच्या मूर्तीची किंमत खूप जास्त असल्यामुळे पीओपीच्या मुर्तींकडेच नागरिकांचा कल दिसून येतो.

नगर – निर्गुण निराकार मातीच्या गोळ्यांना सगुण साकार गणरायांचे रुप मिळाले. त्यांची रंगरगोटीही झाली.या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याच्या कामाला आता वेग येवू लागल्याचे चित्र गणपती मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यातून पहायला मिळत आहे.गणेशोत्सव 1 महिन्यावर येवून ठेपल्याने गणेश मूर्तींच्या कारखान्यातून लगबग दिसून येत आहे.

यंदा नविन मॉडेल्स ऐवजी पारंपारिक बैठकीच्या, शास्त्रोक्त पूजेच्या गणपतींना मोठ्याप्रमाणात मागणी असल्याचे चित्र दिसते आहे. यातही 8 इंचांपासून ते आठ फूटापर्यंतच्या गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. नगर शहरात गणेशमूर्ती तयार करणारे सुमारे 100 कारखाने असून त्यातील काही कारखान्यातून 12 महिने मूर्ती तयार करण्याचे काम सोरू असते, तर काही जण हा व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात करतात. याकारखान्यातून सध्या महिला कारागीरांचे प्रमाण वाढते असल्याचा अनुभव आहे.सध्या अकुशल कारागीर म्हणून या महिला कार्यरत असल्यातरी येत्या काही वर्षातच त्या कुशल कारागीर म्हणून पुढे येतील. यामोसमात नगर शहरातून सुमारे लाख भर मूर्तींची निर्मिती झाली आहे.

सध्या बाजारात टिटवाळा, दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, पद्मासन या पारंपारिक बैठकीच्या मूर्तींना मागणी आहे. लहान आकारातील याच मूर्तींना घरगूती पूजेसाठीही मागणी आहे. अगदी लहान मूर्ती खरेदी करण्यापेक्षा फूट भर आकाराच्या मूर्ती खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल दिसतो. कारण लहान मूर्तीच्या किंमतीत मोठी मूर्ती मिळत असेल तर मोठी मूर्तीचीच स्थापना करण्याकडे भाविकांचा कल आहे.यंदा वीणावाला गणपती, शिवपार्वतीसह गणेश अश्‍या नव्या प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यांनाही मोठी मागणी आहे.

प्रत्येक कारखान्यातून भरपूर वैविध्य असलेल्या गणेश मूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे.प्रत्येक कारखान्यातून 70 ते 150 प्रकारच्या विविध मूर्ती निर्माण केल्या गेल्या आहेत. तसेच पीओपी आणि एअंगांच्या किंमती विशेष वाढल्या नसल्याने यंदा गणेश मूर्तींच्या किंमतीतही विशेष फरक पडलेला नाही. नगर शहरातून पूर्ण राज्यातच नव्हेतर परराज्यातही मूर्ती विकल्या जातात मुंबईला दोन-दोन महिने आधी गणपतीचे स्टॉल उभारले जात असल्याने तेथे आधीच मूर्त्या पाठवाव्या लागतात.त्यामुळे मुंबई,गुजरात, आंध्रप्रदेशात आणि कर्नाटकात लवकर गणेशमूर्ती पाठवाव्या लागतात.तशी यंदाही परराज्यातील मूर्तींची रवानगी सुरू असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)