पगार न दिल्याने भर रस्त्यात मालकाची दुचाकी जाळली; पिंपरी-चिंचवड येथील घटना

पिंपरी – मालकाने कामाचे पैसे दिले नाही, या कारणामुळे कामगाराने मालकाची दुचाकी रागाच्या भरात जाळली. ही घटना चिंचवड येथे रविवारी सायंकाळी घडली. अंकित शिशुपाल यादव (वय 27 सध्या रा. पिंपळे गुरव. मुळगाव उत्तर प्रदेश) असे गाडी जाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा मांजरी येथील गणेश उंदरे पाटील यांच्याकडे एप्रिल महिन्यापासून कामाला आहे. मालकाने आपल्या कामाचे पैसे दिले नाही, या कारणावरून संतापलेल्या अंकित यादव याने मालकाची दुचाकी पळवून आणली. त्यानंतर ती दुचाकी पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील, चिंचवड येथील प्रदीप स्वीट या दुकानसमोर जाळून टाकली.

दुचाकीला आग लागल्याची माहिती पोलीस तसेच आग्निशामक दलास मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने दुचाकीची आग विझवली. पोलिसांनी आरोपी अंकित याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.