वारसा – पोलंडमधील फॅशन उद्योगातील आघाडीचे उद्योगपती मारीक पिकाच आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असून तब्बल 8159 कोटी रुपयांची मालमत्ता असलेला हा उद्योगपती स्वतःच्या कार्यालयात जातानाही मोटार न वापरता सायकलचाच वापर करत आहे.
एलपीपी एस एल ही पोलंडमधील सर्वात मोठी फॅशन वस्तू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे मालक मारेक पिकाच मात्र प्रसिद्धीच्या झगमगाटापासून संपूर्णपणे दूर आहेत. त्यांना स्वतःची छायाचित्रे काढणेही पसंत नाही. आपल्याला कोणी अब्जाधीश म्हणावे हे त्यांना आवडत नाही. मी माझी संपूर्ण मालमत्ता फाउंडेशनला ट्रान्सफर केली असून माझे कुटुंबीय त्या फाऊंडेशनचे लाभार्थी आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
मारेक पिकाच यांच्या या कंपनीचे मुख्य कार्यालय डान्स या शहरांमध्ये आहे. या कार्यालयात कोठेही त्यांच्यासाठी स्वतंत्र केबिन नाही इतर सर्व सहकाऱ्यांसोबत ते सामान्य पद्धतीने टेबलवर बसूनच काम करतात. पिकाच यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामकाजात संपूर्ण स्वायत्तता दिली असून त्यांच्या कल्पनांचे आणि सूचनांचे मनापासून स्वागत केले जाते.
कंपनीला मिळणाऱ्या नफ्याचा कर्मचाऱ्यांना लाभ दिला जातो. पिकाच यांनी 1991 मध्ये आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. तेव्हा पोलंडमधील अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे विकसित होत होती प्रारंभी तुर्कस्तानातून स्वेटर आयात करून यांनी आपला व्यवसाय सुरु केला. त्याला आज पंचवीस देशात अठराशे पेक्षा जास्त स्टोअर्सचे मालक म्हणून पिकाच ओळखले जातात.