पुणे: जनहित फौंडेशन या सामाजिक संस्थेने अनाथ मुलांना खाऊ देत नव वर्षाच्या सुरूवातीसच या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. पुढे वर्षभर विविध उपक्रम राबवत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवण्याचा निर्धार संस्थेने केले आहे.
माणुसकीची अनुभूती देणारा हा उपक्रम व नव वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याची संकल्पना अँड. दिलीप जगताप अनेक वर्षांपासून राबवित आहेत. भिलारेवाडी येथील जनसेवा फौंडेशनमधील अनाथ मुलांना अँड. दिलीप जगताप यांच्या वतीने नव वर्षानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला.
अँड जगताप यांनी दक्षिण उपनगरांमधील शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून जनहित फौंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. यावेळी माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजकारणाचे शिक्षण विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण होऊ शकेल आणि वंचित व अनाथ मुलांचा संभाळ करणाऱ्या संस्थांच्या अडचणही दूर होऊ शकतील असे मत अँड. दिलीप जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.